Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गुंड गणेश मारणेसह तिघांना पोलिसांनी कसे पकडलेः शरद मोहोळ खून प्रकरणात होता...

गुंड गणेश मारणेसह तिघांना पोलिसांनी कसे पकडलेः शरद मोहोळ खून प्रकरणात होता मुख्य सुत्रधार; वाचा सविस्तर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता) 

कुख्यात गुंड शरद मोहोळ याला त्यांच्या कोथरूड मधील घराजवळ गोळ्या झाडून निघृण खून करण्याच्या कटातील मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड गणेश निवृत्ती मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोड येथून पाठलाग करून पकडले. गणेश निवृत्ती मारणे, संतोष पासलकर, राहुल शिंदे अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी गुन्हे शाखेने साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 16 जणांवर नुकताच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

गुंड शरद मोहोळचा 5 जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. यावेळी खून करून पळून जात असताना या तिघांनी आम्ही तर गणेश मारणे टोळीतील पोरं असा आवाज देऊन घटनास्थळावरून धूम ठोकली होती. खुनाच्या या गुन्ह्याला विविध कंगोरे असून नेमका खून कोणत्या कारणासाठी केला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. गुन्हा घडल्यापासून गणेश मारणे हा पोलिसांना चकवा देत होता. तेव्हा पासून गुन्हे शाखेच्या पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. बुधवारी तो नाशिक रोड परिसरातून त्याचे साथीदार संतोष पासलकर आणि राहुल शिंदे यांच्यासोबत जात असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अजय वाघमारे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती. नाशिक रोडवरून ते भोरच्या दिशेला जाणार असल्याची माहिती मिळताच पुण्यातून एक टिम नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आली असता पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, उपनिरीक्षक मोहनदास जाधव व अमंलदारांची टीम रवाना करण्यात आली असता दोन्ही टिमने पाठलाग करून पकडले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शना खाली विविध पथके गणेश मारणेच्या अटकेसाठी रवाना करण्यात आली होती.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments