Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गुंड आसिफ दाढीकडून अजित पवारांची भेटः भेटीचे फोटो आले समोर; आसिफ राजकारण...

गुंड आसिफ दाढीकडून अजित पवारांची भेटः भेटीचे फोटो आले समोर; आसिफ राजकारण येत असल्याच्या चर्चा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इकबाल शेख उर्फ असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. असिफ दाढी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असून, पोलिसांनी त्याला शस्त्रास्त्रांसह अटकही केली होती. अजित पवारांची त्याने भेट का घेतली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर येऊन काही तास उलटत नाही, तोपर्यंत आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे.

आसिफ दाढी राजकारणात येणार?

असिफ दाढीने गुरुवारी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला होता. तृतिय पंथियांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे.

आसिफ शेख उर्फ दाढीवर पहिला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. 1988 साली त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला. या घटनेतून त्याने गुंडगिरीमध्ये पदार्पण केले. मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं.

• 2021 पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले.

• 1988 मध्ये मारहाण करणे,

• 1996 आणि 2004 साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे

• 2007 मध्ये अपहरण करून हत्या करणे

• 2009 आणि 2011 साली शस्त्राचा वापर करणे

• विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचणे

• 2021 साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे

अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे. 2011 साली पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने असिफ दाढीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती.

अजित पवारांचा गुंडाच्या भेटीचा फोटो समोर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर त्या भेटीला अजित पवारांनी चुकीचं म्हटलं होतं. मात्र आता पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ दाढीसोबतचा अजित दादांचा फोटो समोर आला आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments