इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अशातच पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तरुणीवर बलात्कार करुन त्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. ही घटना ऑगस्ट 2023 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी आरोपी सद्दाम सय्यद (वय-26) याच्याविरुद्ध बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनसार, तरुणी आणि आरोपी हे एकत्र एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख वाढली होती. एके दिवशी कामानिमित्त दोघेजण हॉटेलमध्ये थांबले होते त्यावेळी आरोपीने तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे तरुणीला ते पाणी पिल्यानंतर गुंगी आली. तरुणी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी सद्दामने त्या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो काढले. तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून 1 लाख 2 हजार 850 रुपये ऑनलाईन घेतले आहे. तसेच 2 लाख 78 हजार रुपये रोख जबरदस्तीने तरुणीकडून घेतल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.