Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजगावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई: 1 कोटी 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेच्या...

गावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई: 1 कोटी 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेच्या सुरक्षा पथकाने हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे येथे कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने हवेली तालुक्यात वडगाव शिंदे याठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या केंद्रावर कारवाई करून सुमारे एक कोटी सात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक गोवर्धन सोलंकी (वय-44, राहणार- वडगाव शिंदे, तालुका-हवेली, पुणे) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार अरुण रमेश कुवरीया, संजय जगन्नाथ कुवरीया (दोघे राहणार-वडगाव शिंदे, तालुका- हवेली, पुणे) यांच्या सह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तुषार नामदेव हिवरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर भादवि कलम 328, 34, सह महाराष्ट्र प्रोहिबीशन अधिनियम कलम 65 नुसार कारवाई करण्यात आलेली आहे.

आरोपींच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, १५०० लिटर तयार हातभट्टी दारू व हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एक कोटी सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे वडगाव शिंदे या ठिकाणी शेत गट नंबर 421 या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मनुष्यास गुंगी येऊन जीवितास हानी होईल अशाप्रकारे गावठी हातभट्टी दारू तयार करत होते. सदर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन भट्टी लावून मोठ्या प्रमाणात, गावठी हातभट्टी दारू तयार केली जात होती. याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावकर आणि अनिकेत पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बंकर मध्ये दारूभट्टीची निर्मिती

वडगाव शिंदे गावामध्ये आरोपींनी जमीन खोदून खड्डा करत त्यात बंकर बांधून पाच सिमेंटचे टाकी बनवून देशी हातभट्टी दारू उत्पादन सुरू केले होते. तर एका खड्ड्यात प्लास्टिक पेपर टाकून त्यात दारू तयार होण्यास झाकून ठेवण्यात आली होती. पोलिसांना गोपनीय माहिती द्वारे मिळालेल्या माहिती नुसार मोकळ्या जमिनीवर काही ठिकाणी जमिनीवर खालीवर माती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खोदाई केली असता, जमिनीच्या खाली बंकर मध्ये लाखो लिटर दारू मिळून आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments