इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेरणे गाव ते कोळपे वस्ती परिसरात रस्त्याच्या बाजूला गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट 6 कडील गुन्हे प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 30) ही कारवाई केली आहे.
निलम बजरंग परदेशी (वय-30 रा. मोलाई चौक, पेरणे, ता. हवेली), असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 70 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 5 हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 4 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पेरणे गाव ते कोळपे वस्ती रोड येथील रस्त्याच्या कडेला पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी निलम परदेशी ही महिला भट्टी लावून दारू काढत असल्याचे दिसून आले.
तिच्याकडून पोलिसांनी 70 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 5 हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 4 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिला पुढील कारवाईकामी लोणीकंद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली आहे.