Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज गाझा पट्टीत आमने- सामनेची लढाई सुरु झाल्यावर काय होईल? जाणून घ्या

गाझा पट्टीत आमने- सामनेची लढाई सुरु झाल्यावर काय होईल? जाणून घ्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जेरुसलेम : हमासने शनिवारी इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला केला. हमासच्या या कृतीमुळे इस्रायल प्रचंड खवळला आहे. इस्रायली सैन्य कधीही गाझा पट्टीत घुसू शकतं. गाझाच्या सीमेवर इस्रायली सैनिक जमले आहेत. इस्रायलचे रणगाडे सुद्धा तिथे सज्ज आहेत. फक्त ऑर्डरची प्रतिक्षा आहे. हमासच्या हल्ल्यात 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे बदला घ्या, हीच भावना इस्रायली जनतेची आहे. हमासला संपवण्याच चंग इस्रायलने बांधलाय. पॅलेस्टाइनला लक्षात राहील, असा धडा शिकवायच इस्रायलचा उद्देश आहे. सध्या इस्रायलकडून फक्त हवाई कारवाई सुरु आहे. इस्रायलची फायटर विमान गाझा पट्टीत बॉम्ब फेक करत आहे. पण येणाऱ्या दिवसात या लढाईच स्वरुप आणखी व्यापक होणार आहे. गाझा पट्टीत इस्रायली फौजा घुसल्याने खऱ्या युद्धाला सुरुवात होईल. इस्रायली सैन्याकडे गाझा पट्टीचे सर्व नकाशे आहेत. त्यामुळे तिथे काय स्थिती आहे, याची इस्रायली लष्कराला कल्पना आहे.

संपूर्ण गाझा पट्टी याआधी सुद्धा इस्रायलने ताब्यात घेतली होती. पण गाझामध्ये घुसून युद्ध लढण तितक सोप नाहीय. गाझा पट्टी हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. इथे इमारती खेटून उभ्या आहेत. गाझा जेवढं वर दिसत, तेवढच जमिनीखाली सुद्धा आहे. तिथे जमिनीखाली अनेक बोगदे, बंकर बांधलेले आहेत. गाझात घुसल्यानंतर आमने-सामनेची लढाई सुरु होईल. इस्रायलकडे कितीही अत्याधुनिक शस्त्र असली, हमासचे दहशतवादी मारले गेले, तरी इस्रायलला सुद्धा नुकसान सहन कराव लागू शकतं. त्यामुळे जमिनीवरची लढाई वाटते तितकी सोपी नाहीय. हमास जी हरकत केलीय, ती खूप विचारपूर्वक केलीय. याचे काय आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हमासचे दहशतवादी सुद्धा गाझा पट्टीत या लढाईसाठी तयार असणार. अशावेळी गाझा पट्टीत घुसण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल.

आमने-सामनेची लढाई सोपी नसेल, कारण……

मोठ्या युद्धाची सुरुवात करताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा इस्रायलला ठरवावा लागेल. रशिया-युक्रेन युद्ध त्याच उत्तम उदहारण आहे. काही दिवसात हे युद्ध संपेल असं बोलल जात होतं. पण आता दीड वर्ष होत आलं, तरी अजूनही युद्धा सुरुच आहे. कारण एकदा युद्ध सुरु झालं की, त्यात आपला फायदा शोधणारे बरेच असणार. आताच इस्रायल विरोधात अरब आणि मुस्लिम देशांची एकजूट दिसू लागली आहे. हे सर्व घटक एकत्र आले आणि त्यातले काही देश युद्धात उतरले, तर इस्रायलची मुश्किल वाढू शकते. त्यामुळे आमने-सामनेची लढाई सोपी नसेल.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments