Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गांजा विक्री करता का म्हणत खंडणीची मागणीः एका महिलेसह तिच्या साथीदारावर...

गांजा विक्री करता का म्हणत खंडणीची मागणीः एका महिलेसह तिच्या साथीदारावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात एका व्यक्तीला गांजा विक्री करता का म्हणत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर आरोपीकडून खंडणीची मागणीदेखील करण्यात आली. सदर व्यक्तीने आरोपींना पैसे देणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर आरोपींनी त्यांना मारहाणही केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात महिलेसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल दिलीप परांडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण नेमकं काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी आणि पुरूषाने फिर्यादी परांडकर यांना तुम्ही गांजा विक्री करता का?, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं. पोलिस केस करायची नसल्यास त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. त्यानंतर परांडकर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांच्या अंगावर गांजा असलेल्या पुड्या फेकल्या व त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्याआधारे पुन्हा खंडणीची मागणी केली.

तरीही पैसे देण्यास परांडकर यांनी नकार दिल्याने आरोपींनी दमदाटी केली. तसेच, त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. हा प्रकार जुना मुंढवा येथील गणेश पार्कच्या गल्ली नंबर 4 मध्ये घडल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून खात्याचे केवायसी अपडेट करायचे, असे खोटे सांगितले. तसेच बँक खात्याविषयी सर्व गोपनीय माहिती घेऊन खात्यातील तब्बल 5 लाख रूपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मोबाईल धारक आणि बँक खातेधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहन कान्हेरे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments