Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गांजा विक्री करणारे उत्तर प्रदेशातील दोघे पोलिसांकडून जेरबंदः खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात...

गांजा विक्री करणारे उत्तर प्रदेशातील दोघे पोलिसांकडून जेरबंदः खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात महिलांकडून दागिने चोरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे अहमदनगर रस्त्यावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सागर कुमार (वय 23), शिवम सरोज (वय 22, दोघे मूळ रा. गोरीडी, संत बिरदास नगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. चंदननगर परिसरातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा या अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना मिळाली.त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी सागर आणि शिवम यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची कसून तपासणी करण्यात आली.

त्यावेळी पिशवीत गांजा मिळून आला. दोघा आरोपीकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल असा ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ यांनी ही कारवाई केली आहे.

खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात महिलांकडून दागिने चोरी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरलेल्या अज्ञात महिलांनी दोन लाख ८२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना रविवार पेठेत घडली आहे. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठेतील सराफ बाजारात व्यावसायिकाची पेढी आहे. सदर सराफी दुकानात तीन महिला आल्या होत्या. संबधित महिलांनी काळा बुरखा परिधान केले होता. सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी दोन लाख ८२ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या हळूच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले अहे. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments