Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजगांजा प्रकरणात जेरबंद केलेली महिला फरारः लोणीकंद पोलिस ठाण्यातून फरार महिलेचा शोध...

गांजा प्रकरणात जेरबंद केलेली महिला फरारः लोणीकंद पोलिस ठाण्यातून फरार महिलेचा शोध सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली परिसरात गांजा विक्री प्रकरणात जेरबंद केलेली महिला आरोपी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यातून पोलिस कामात व्यस्त असताना नजर चुकवून पसार झाल्याची घटना घडली आहे. छकुली राहुल सुकळे (वय-24, रा. वाघोली, पुणे) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव असून तिचा शोध पोलिसांची पथके घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातील गायरान वस्ती याठिकाणी एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 25 एप्रिल रोजी रात्री लोणीकंद पोलिसांनी छापा मारुन छकुली सुकळे या आरोपी महिलेस पकडले. तिच्या ताब्यातून एक किलो 329 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. परंतु रात्रीची वेळ असल्याने तिला अटक न करता, तिला नोटीस देऊन 26 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता अटक कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलिस ठाण्यात तिला घेऊन आल्यानंतर महिला पोलिस शिपाई एस तळेकर तिच्यावर लक्ष्य ठेवत होत्या. तिचे हाताचे ठसे घेऊन झाले होते. परंतु सीसीटीएनएस कक्षात काम करत असताना, आरोपी छकुली सुकळे ही पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातून पसार झाली. पोलिसांना सदर बाब लक्षात आल्यानंतर, धावपळ उडाली व तिचा सर्वत्र शोधाशोध सुरु करण्यात आला. परंतु ती मिळून न आल्याने याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे यांनी आरोपी विरोधात भादवि कलम 224 नुसार तक्रार दाखल केली आहे. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास करे यांचे पथक पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments