Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजगांजा तस्करी करणाऱ्या इंजिनिअरसह 3 जणांना अटकः 27 किलो गांजा जप्त;

गांजा तस्करी करणाऱ्या इंजिनिअरसह 3 जणांना अटकः 27 किलो गांजा जप्त;

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गांजा तस्करी करण्यासाठी धुळ्यातून पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या सिव्हील इंजिनिअरसह तिघांना अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई १३ फेबुवारीला कात्रज परिसरात केली आहे. हरीओम संजय सिंग (वय २१ रा. धुळे) आणि करण युवराज बागुल (वय २३ रा, ता. शिरपुर जि. धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे पथकासह हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कात्रज परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून हरीओम आणि करणला ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातुन ४ लाख ८४ हजारांचा २३ किलो गांजा, २२ हजारांचे दोन मोबाइल जप्त केले. त्यांच्याकडे गांजा विक्रीसाठी देणारा वसंत सुभाष क्षिरसागर (रा. आंबेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेत सव्वा चार किलो गांजा जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रविण पवार, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, मारुती पारधी, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, रेहना शेख यांनी केली.

गांजा तस्कर उच्चशिक्षित

हरीओम संजय सिंग इलेक्ट्रीक दुरूस्तीची कामे करीत असुन त्याच्यावर शिरपुर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे. तर करण युवराज बागुल हा सिव्हिल इंजिनिअर असुन त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

गांजा ओढण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

गांजा ओढण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघाजणांनी एकमेकांना बेदम मारहाण केल्याची घटना जुना मंगळवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हुसेन हसन शेख (वय ६० रा. जुना बाजार मंगळवार पेठ) आणि अजय दगडू जाधव (वय २४, रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि हुसेन एकाच परिसरात राहायला असून एक महिन्यापुर्वी हुसेनने अजयला गांजा ओढण्यासाठी १०० रूपये मागितले होते.

मात्र, त्याने पैसे न दिल्याच्या रागातून हुसेनने अजयवर वार करून गंभीररित्या जखमी केले. तर, दीड महिन्यांपुर्वी अजयने हुसनेला गांजासाठी पैसे मागितले होते. मात्र, त्यानेही पैशाला नकार दिल्यामुळे अजयने त्याला दगडाने मारहाण केली. याप्रकरणी फरासखाना पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments