Monday, January 13, 2025
Homeक्राईम न्यूजगहू, हरभरा, कांद्याच्या विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; आतापर्यंत १८.७९ लाख शेतकऱ्यांनी उतरवला...

गहू, हरभरा, कांद्याच्या विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; आतापर्यंत १८.७९ लाख शेतकऱ्यांनी उतरवला विमा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः राज्यात यंदा रब्बीचा पेरा वाढण्याचे संकेत असताना विमा उतरविण्यातदेखील शेतकऱ्यांनी आघाडी घेतली आहे. गहू, हरभरा, कांद्याचे विमा अर्ज शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, केवळ एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागाची सवलत अद्याप सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी चालू रब्बीतदेखील मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद देतील. राज्यभरातून २७ नोव्हेंबरअखेर १८.७९ लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२३-२४ च्या रब्बी हंगामात एकूण ७१.८७ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यात सर्वांत कमी शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील होते. तेथील केवळ ६९ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. चालू रब्बी २०२४-२५ मध्ये मात्र बीडपेक्षाही परभणीने आघाडी घेतली आहे. बिगर कर्जदार गटात परभणीतून आतापर्यंत २.७४ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. नुकसान भरपाई मिळण्याच्या आशेने नियमांकडे दुर्लक्ष करून विमा काढला जातो. दुसऱ्याच्या शेतावर, शासकीय जमिनीवर, मंदिर, मशीद, ट्रस्ट, औद्योगिक वापराच्या जमिनीवर तसेच अकृषक अथवा बिगर पेऱ्याच्या शेतजमिनीचा विमा काढू नये, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments