Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गळ्यात संत्र्यांची माळ अन् हातात निषेधाचे बॅनर्स; खोके सरकार हाय हाय!, विधीमंडळाच्या...

गळ्यात संत्र्यांची माळ अन् हातात निषेधाचे बॅनर्स; खोके सरकार हाय हाय!, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा हल्लाबोल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नागपूर | 07 डिसेंबर 2023 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अशात विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केलं आहे. गळ्यात संत्र्यांची माळ घालत आणि हातात निषेधाचे बॅनर्स घेत विरोधी पक्षातील नेते विधीमंडळ परिसरात पोहोचले. विधीमंडळ पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेते जमले आणि त्यांनी शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. खोके सरकार हाय हाय!, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिंदे सरकारचा निषेध विरोधी पक्षांनी यावेळी केला. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे सरकारचा निषेध करण्यात आला.

विरोधकांची घोषणाबाजी

नागपुरात विधीमंडळ परिसरात विरोधकांनी सरकराच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार 420!, बळीराजा अवकाळीने ग्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, खोके सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून करण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

विरोधी पक्षनेते म्हणाले…

विधीमंडळ परिसरात विरोधकांकडून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नाही. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. मदत देत नाही. कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे नेते म्हणाले…

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी सूडा पोटी केली जात आहे. ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं सुनील प्रभू म्हणाले.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments