Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज गळयातील लॉकेट बनविण्यासाठी बिबट्याचा पंजा कापला: आरोपी गजाआड; वनविभागाची कारवाई

गळयातील लॉकेट बनविण्यासाठी बिबट्याचा पंजा कापला: आरोपी गजाआड; वनविभागाची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बिबट्यांचे नखांचे गळयातील लॉकेट बनविण्यासाठी एका मृत बिबट्याचा पायाचा पंजा व नखे कापून नेल्याप्रकरणी एका व्यक्तीसह तीन अल्पवयीन मुलांवर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

वनपरिक्षेत्र पुणे अंर्तगत मौजे वडगाव शिंदे येथे हा गुन्हा घडल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. आरोपींकडून बिबटयाचा पंजा, चार नखे व दोन सुरे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे व तीन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार हवेली तालुक्यातील पुणे वन परिक्षेत्र अंर्तगत मौजे वडगाव येथे गुरुवारी रात्री घडल्याचे सांगण्यात आले आहे. सदर ठिकाणचे शेतकरी नवनाथ खांदवे यांच्या शेतात उस तोडणीचे काम सुरु होते. त्यावेळी उस तोडणी करणाऱ्या मजुरांना शेतात एक बिबटया मृतावस्थेत मिळून आला. याबाबत त्यांना माहिती मिळताच, त्यांनी वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार सुमारे दहा महिन्याचे एका मृत मादी बिबटयाला ताब्यात घेण्यात आले. सदर मृत मादी बिबट्याचा मृत्यु हा कुत्र्यांचे हल्लयात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. परंतु मृत बिबटयाचे पुढील उजव्या पायाची तीन नखे तसेच मागच्या उजव्या पायाचा पंजा देखील गायब असल्याने खळबळ उडाली.

मयत बिबटयाचे शवविच्छेदन केल्यावर बिबटयाचे पायाची तीन नखे व पंजा हा धारदार शस्त्राने कापल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊ, श्वान पथकाचे सहाय्याने तपास केला. त्यावेळी उसतोडणी मजुरांकडे चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी मजुरांचे पुरुष मजूर, महिला मजूर व मुले असे वेगवेगळे गट करुन चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने वडीलांच्या व सोबतच्या दोन अल्पवयीन मुलांचे मदतीने मृत बिबटयाचे तीन नखे व पायाचा पंजा व त्याचे एक नख असे चार नखे कोयता व सुरीच्या सहाय्याने कापून ठेवल्याची कबुली दिली.

सर्व आरोपींची चौकशी केली असताना त्यांनी नखांचे गळयातील लॉकेट बनविण्याकरिता संबंधित कृत्य केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चार बिबटयांची नखे, एक पायाचा पंजा व गुन्हयात वापरलेले दोन सुरे जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षणक पुणे एन.अगर. प्रवीण यांचे मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पुणे विभाग महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक अाशुतोष शेंडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल सीमा मगर, वनरक्षक अनिल राठोड, रेसक्यू संस्थेचे तुहिन सातारकर, किरण रहाळकर, वाइल्डलाइफ डिटेक्शन डॉग खंडू, डॉ. चेतन वंजारी, नरेश चांडक, श्रीनाथ चव्हाण, एकनाथ मंडल, अमित तोडकर याांचे पथकाने केली अाहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments