Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजगर्लफ्रेंडशी फोनवर वाद झाला; रागाच्या भरात 18 वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

गर्लफ्रेंडशी फोनवर वाद झाला; रागाच्या भरात 18 वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ठाणे: ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गर्लफ्रेंडशी फोनवर भांडण झाल्यामुळे एका 18 वर्षीय तरुणानं रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या मुंब्रा भागातील अमृत नगरमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण फोनवर आपल्या गिर्लफ्रेंडशी बोलत होता. त्यानंतर या दोघांमध्ये काही एक कारणावरून वाद झाला आणि हा वाद टोकाला गेला असता मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने स्वतःला संपवलं आहे. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांनी पोलिसांना तातडीने कळवलं.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वादामागचं नेमकं कारण काय होतं? त्याच्या आत्महत्येमागे अजून काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments