Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजगर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केला "हा" ठराव

गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केला “हा” ठराव

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आले आहे.. याप्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासनावर चहूबाजूनी टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवरच आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही असा ठराव करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या उपचारासाठी कुटुंबीयांकडून दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. असा आरोप देखील भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आणि रुग्णालयावर टीकेची झोड उठली. यानंतर आता रुग्णालयाने मोठा निर्णय घेत यापुढे इमर्जन्सी असेल किंवा प्रसुती असेल कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला तर त्या रुग्णाकडून कोणतीही अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतल जाणार नाही असा ठराव रुग्णालयाच्या बैठकीत करण्यात आला आहे. थोड्यावेळापूर्वी हा निर्णय रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब आणि आर्थिक दुर्बल घटलातील रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर या प्रकरणात समितीची घोषणा केली. पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तालयामार्फत राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात रुग्णालयाच्या चौकशीचा अहवाल समोर आला, त्यामध्ये अनेक खुलासे समोर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments