Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज 'गरीब नेता लग्नात कोट्यवधी खर्च करतो म्हणजे..., राघव चड्ढा यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह

‘गरीब नेता लग्नात कोट्यवधी खर्च करतो म्हणजे…, राघव चड्ढा यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्डा यांनी २४ सप्टेंबर २०२३ नव्या आयुष्याला सुरुवात केली •आहे. मोठ्या थाटात राघव आणि परिणीती यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं आहे. सध्या सर्वत्र राघव आणि परिणीती यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लग्नानंतर खुद्द परिणीती आणि राघव यांनी लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. राघव – परिणीती यांच्या लग्नात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाही थाटात परिणीती आणि राघव यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.

सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या शाही विवाहाची चर्चा रंगली आहे. अनेक महागड्या वस्तू आणि फुलांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं ठिकाण सजवण्यात आलं होतं. लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर राघव चड्ढा यांच्या संपत्तीबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. अशात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या ट्विटनंतर राघव चड्ढा यांच्याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे.

अभिनेता आणि सिनेविश्लेषक कमाल राशिद खान उर्फ के आरके यांने राघव चड्ढा यांच्याबद्दल एक ट्विट केलं आहे. ट्विट करत अभिनेता म्हणाला, ‘निवडणूक लढवताना माझ्याकडे ५० ते ७० लाख रुपयांची संपत्ती आहे, असं राघव चड्ढा म्हणाले होते! एवढ्या गरीब नेत्याने लग्नात कोट्यवधी रुपये कसे खर्च केले! आयकर विभाग याचा हिशेब मागू शकतात! मागायला तर हवा..!’ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र केआरके याने केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.

राघव चड्ढा – परिणीती चोप्रा यांची नेटवर्थ

निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार राघव चड्ढा यांच्याकडे एकूण ५० लाख रुपयांची संपत्ती असून, त्यांच्याकडे ३७ लाख रुपये इतर संपत्ती आहे. राघव चड्ढा यांच्याकडे मारुती स्विप्ट कार आहे. याशिवाय त्यांच्याकडे ९० ग्रॅम सोनं आहे. ज्याची किंमत जवळपास ४ लाख रुपये आहे.

परिणीती चोप्रा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, परिणीती हिच्याकडे जवळपास ६० कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्री प्रत्येक सिनेमासाठी ४ ते ६ कोटी रुपये मानधन घेते. अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्रीकडे Audi A-6, Jaguar XJL, Audi Q-5 सारख्या लक्झरी कार आहेत.

RELATED ARTICLES

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

Recent Comments