इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खडकवासला : पुणे जिल्ह्यातील पानशेत पाणलोट क्षेत्रात जलसंपदाविभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत गरिबांच्या घरांना लक्ष्य केले जात असताना, याच परिसरातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा महाराष्ट्र विधिमंडळाच्या गाजला. आमदार भीमराव तापकीर यांनी या अन्यायकारक कारवाईकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
अधिवेशनात आमदार तापकीर यांनी सभागृहात सांगितले की, २५ फेब्रुवारी २०२५ला वेल्हा तालुक्यातील वंझारवाडी येथील धरणग्रस्त शेतकरी किसन शंकर कडू, विजय दिनकर कडू आणि हरिभाऊ शंकर कडू यांच्या जुन्या घरांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करीत ती पाडण्यात आली.
विशेष म्हणजे, या कुटुंबांचे पानशेत धरणग्रस्त म्हणून पूनर्वसन झाल्याचा इतिहास आहे. मात्र, त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि इतर व्यावसायिक बांधकामांवर कोणतीही कारवाई झाली नाही, ही बाब गंभीर असल्याचे तापकीर यांनी नमूद केले. एकाच पाणलोट क्षेत्रात गरिबांवर कारवाई करून श्रीमंत व्यावसायिकांना संरक्षण देणे ही शासनाची अन्यायकारक भूमिका आहे, असेही आमदार तापकीर यांनी स्पष्ट करीत शासनाने निष्पक्ष कारवाईची मागणी केली.