Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजगरवारे महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अॅड. विजयानंद दुशिंग यांचे निधन

गरवारे महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अॅड. विजयानंद दुशिंग यांचे निधन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गरवारे महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक विजयानंद देवदत्त दुशिंग (वय – 70) यांचे बुधवारी (ता. 03) पुणे येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. दुशिंग यांनी मरणोत्तर देहदान केले आहे.

विजयानंद देवदत्त दुशिंग हे गरवारे महाविद्यालयात इंग्रजी साहित्य आणि इंग्रजी भाषा या विषयाचे प्राध्यापक होते. अगदी मृदू भाषी असणारे दुशिंग त्यांच्या शिकवणी मध्ये इंग्रजी भाषा सोपी करून विद्यार्थ्यांना विनोद आणि कथांच्या साह्याने शिकवत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची एक वेगळीच ओळख होती.

शिक्षणक्षेत्रा व्यतिरिक्त दुशिंग यांना सामाजसेवेची आवड होती “आपल घर” या सामाजिक संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. आपल घर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार मुलांना आधार देण्याचे काम केलं आहे. गरवारे महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर दुशिंग यांनी वकिली च्या माध्यमातून उच्चन्यायालय, युनिव्हर्सिटी ट्रायबुनल, मॅट, सेशन्स कोर्ट येथे अनेक वंचित आणि अन्याय झालेल्या गोर गरीब लोकांना मदत केली.

दरम्यान, त्यांना संगीताची आणि गायनाची देखील आवड होती. तसेच ते सुंदर हार्मोनियम वाजवत होते. विजयानंद दुशिंग यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात क्रिमिनल वकील अॅड. विपुल दुशिंग यांचे ते वडील होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments