इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
प्रोटीन हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असते. हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषकतत्व आहे. मात्र, याचे किती प्रमाण असावे हे माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. सध्या प्रोटीन आरोग्यदायी मानून अनेकजण हाय-प्रथिनेयुक्त आहार मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. पण, हे वेळीच थांबवणे गरजेचे आहे. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
आहारात जास्त प्रमाणात प्रोटीनचा समावेश केल्याने शरीरात असंतुलन होऊ शकते आणि मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर दबाव येऊ शकतो. तुम्ही विचार न करता जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल, तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः जे लोक आधीच मूत्रपिंड किंवा यकृत संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हाय प्रोटीनयुक्त आहार गंभीर धोका बनू शकतो. योग्य प्रमाणात संतुलित आहार घेणे हा आरोग्यासाठी योग्य उपाय आहे.
जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः जे लोक लो-कार्ब आणि हाय-प्रोटीन आहाराचे पालन करतात, त्यांच्या शरीरात फायबरची कमतरता असते, ज्यामुळे पचनसंस्था कमजोर होऊ शकते. प्रोटीनच्या अतिसेवनामुळे किडनीवर दबाव वाढतो, कारण किडनीला टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी जास्त कसरत करावी लागते. जास्त काळ प्रथिनांचे सेवन केल्यास किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.