Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज 'गदर 2'ने 'जवान' पेक्षा अधिक पैसे कमावले? जाणून घ्या शाहरुख- सनी देओलच्या...

‘गदर 2’ने ‘जवान’ पेक्षा अधिक पैसे कमावले? जाणून घ्या शाहरुख- सनी देओलच्या चित्रपटांमागील खरं गणित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचा शाहरुख खानच्या ‘जवान’ पेक्षा जास्त फायदा झाला, हे ऐकून थोडंसं अजब नक्कीच वाटू शकतं. मात्र हेच सत्य आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मात्र प्रॉफिट मार्जिनबद्दल बोलायचं झालं तर सनी देओलचा ‘गदर 2’ त्यावर भारी पडेल. या दोन्ही चित्रपटांचा बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन याच्या माध्यमातून ही गोष्ट समजता येईल. कारण बजेटमधील फरक हाच प्रॉफिटमधील फरक स्पष्ट करू शकतो. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचं नेमकं गणित काय ते जाणून घेऊयात….

चित्रपटांचा बजेट

11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ ने आत्तापर्यंत भारतात 525 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘जवान’ने भारतात 613 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र जेव्हा बजेटचा प्रश्न येतो तेव्हा ‘गदर 2’ हा फक्त 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. तर शाहरुखचा ‘जवान’ या चित्रपटाचा बजेट तब्बल 300 कोटी रुपये इतका आहे. ‘जवान’ आणि ‘गदर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या बजेटच्या आकड्यावरून हे स्पष्ट समजू शकतो की या दोन्ही चित्रपटांपैकी कोणाला सर्वात जास्त यश मिळालं.

कमाई

‘गदर 2’ने त्याच्या बजेटपेक्षा सात पटीने जास्त कमाई करत बॉक्स • ऑफिसवर स्वतःला ब्लॉकबस्टर ठरवलं आहे. तर 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘जवान’ने भारतात आत्तापर्यंत केवळ दुप्पटच कमाई केली आहे. मात्र जगभरात शाहरुख खानच्या चित्रपटाने 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सनी देओलचा ‘गदर 2’ हा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा या चित्रपटाचा सीक्वेल आहे. तब्बल 22 वर्षांनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अमिषा पटेल आणि सनी देओलची हीट जोडी मोठ्या पडदावर एकत्र आली. तर दुसरीकडे ‘पठाण’ या चित्रपटानंतर शाहरुख खानचा ‘जवान हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आहे. जगभरात 1100 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटात शाहरुखसोबतच दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments