Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजगतिमंद मुलासह आईला बेदम मारहाण; पती-पत्नीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गतिमंद मुलासह आईला बेदम मारहाण; पती-पत्नीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती, (पुणे) : लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवल्याच्या कारणावरून गतिमंद मुलाला व त्याच्या आईला त्याच वसाहतीत राहणाऱ्या पती -पत्नीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 07) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चव्हाण इको व्हिलेज, सातव शाळेच्या मागे, दादाराम बापु माळीनगर, बारामती येथे ही घटना घडली. याप्रकरणी पती पत्नीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगिता अंकुश झगडे व अंकुश झगडे दोघे (रा. दोघेही ए-3/फ्लॅट नं.12, चव्हाण इको व्हिलेज, सातव शाळेच्या मागे, दादाराम बापु माळीनगर, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वंदना राजेंद्र महामुनी (वय-40 धंदा-मजुरी) यांनी आज बुधवारी (ता. 14) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना महामुनी व आरोपी संगिता अंकुश झगडे व अंकुश झगडे हे दोघेही एकाच वसाहतीत राहतात. फिर्यादी यांचा मुलगा शुभम हा मतिमंद आहे. त्यांना ये-जा करण्यासाठी लिफ्ट आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवल्याच्या कारणावरून फिर्यादी यांचा मुलगा गतिमंद असल्याचे माहित असताना देखील आरोपी संगिता व अंकुश झगडे या दोघांनी त्याला हाताने मारहाण केली.

दरम्यान, फिर्यादी भांडणे सोडवण्यासाठी गेले असता दोघांनीही हाताने मारहाण करून त्यांच्या डावे कानाला गंभीर दुखापत केली. व त्याच्या कानाचा पडदा फाटला अशी तक्रार वंदना महामुनी यांनी दिली आहे. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात झगडे पती -पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अंमलदार ससाणे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments