इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्यातून जाणाऱ्यांसाठी रेल्वेने 12 विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्या पुणे ते रत्नागिरी दरम्यान धावणार असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या 24 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत.
कोकणात गणोशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यासाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. अशातच पुण्यात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील अनेक नागरिक राहतात. त्यामुळे रेल्वेने या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक 01447 शनिवारी 23, 30 ऑगस्ट व सहा सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री 12 वाजून 25 वाजता सुटेल. ती रत्नागिरी येथे सकाळी 1150 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01488 साप्ताहिक विशेष रेल्वे शनिवार 23, 30 ऑगस्ट आणि सहा सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी 5.50 वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.
या गाड्यांचे आरक्षण 24 जुलैपासून http://www.irctc.co.in वर व सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर विशेष शुल्कासह सुरू होईल. या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.