Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला...

गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मोबाइल हा आता केवळ वस्तू राहिलेला नाही. त्यामध्ये आपल्या सर्व आठवणी, महत्त्वाचे नंबर, अनेक सुखदु:खाचे प्रसंग चित्रित केलेले व्हिडीओ जीवापाड जपलेले असतात. त्यामुळे मोबाइल हा आता सर्वांचा सख्या, मित्र-मैत्रिणीपेक्षा अधिक झाला आहे. जीवनाचे सर्व अंग व्यापून राहिलेला हा मोबाइल चोरीला गेला तर? पुणे पोलिसांच्या “लॉस्ट अँड फाउंड” या ऑनलाइन पोर्टलवर गणेशोत्सवादरम्यान (दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२३) १९२७ मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सर्वाधिक मोबाइल चोरी विसर्जन मिरवणुकीत होते. त्यात ही बेलबाग चौक ते मंडई या परिसरात जेव्हा महत्त्वाचे गणपती मिरवणुकीत सहभागी होतात, तेव्हा या घटना अधिक होतात. तेव्हा देखावे पाहताना तसेच मिरवणुकीत आपला मोबाइल याकडे लक्ष द्या, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल चोरी किती, सापडले किती?

गणेशोत्सव सुरू होऊन ६ दिवस झाले आहेत. यादरम्यान पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अॅन्ड फाउंड वर ९२७ तक्रारी आल्या असून, फक्त २५ मोबाइल रिकव्हर झालेले आहेत. गेल्या आठ महिन्यात तब्बल २५ हजार ५५७ मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ७६१ मोबाइल रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शोध कसा लागतो?

पोलिसांचे तांत्रिक विश्लेषण करणारे पथक असते. मोबाइलच्या ११ आकडी आयएमईआय नंबरचा वापर करून मोबाइलचे लोकेशन मिळवले जाते. त्यानुसार मोबाइल तज्ज्ञ हरवलेल्या मोबाइलचा मागोवा घेतात.

मोबाइल चोरीला गेला तर हे कर…

https://admin.punepolice.gov.in/LostFoundReg.या पोर्टलवर जा.

– तेथे दिलेला सर्व तपशील व्यवस्थित भरा.

– त्यानंतर कॅप्चा टाकून “सबमिट” या बटणावर क्लिक करा.

– नॅशनल वेबसाइट https://ceir.gov.in यावरही तक्रार करता येते.

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments