इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात ट्रक आणि स्कूटरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दिपाली युवराज सोनी (२९) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक ड्रायव्हर शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51, रा भवानी पेठ, पुणे) यास ताब्यात घेतले आहे. दिपाली व जगदीश दोघेही सिग्नल सुटल्याने स्कूटरवरून पुढे जात असताना पाठीमागच्या बाजूने ट्रक क्रमांक MH 14 AS 8852 याने स्कूटरला धडक दिली. या अपघातात दिपाली सोनी या जागीच मयत झाल्या. तर त्यांच्या सोबत असलेले जगदीश सोनी जखमी झाले आहेत.
त्यांना स्पायरल हॉस्पिटल गंगाधाम चौक या ठिकाणी उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी BNSS कलम 105 (आयपीसी 304) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस व महानगरपालिका या अनुषंगाने योग्य ती कारवाई करत आहे. भरचौकात हा अपघात घडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे काही वेळ नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.