इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड : बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं आहे. खोक्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचा दावा करत ही कारवाई वनविभागानं केली आहे.
अधिक माहिती अशी की, सतीश भोसले उर्फ खोक्या गुन्हेगार आहे म्हणून नाही तर त्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधलं असल्यामुळे त्याच्या घरावर कारवाई केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. सतीश भोसले याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही सरकारने कारवाई करावी. असा आक्रमक पवित्रा खोक्याच्या बहिणीने घेतला आहे. या प्रकरणी सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसलेच्या बहिणीने केली आहे.
सुरेश धस म्हणाले…
यावर सुरेश धस म्हणाले की, “मी आता तिथेच चाललो आहे. मी वन खात्याच्या काही लोकांना बोलावलं आहे, त्यांच्याशी मी बोलतो. कोणाचे घर पाडणे ही काही चांगली गोष्ट नाही. ती अॅक्शन का घेण्यात आलीय? हे देखील मी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलणार आहे. असे सुरेश धस म्हणाले.