Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजखेड शिवापूर टोलनाक्याजवळ दारूचा टँकर उलटला ! पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दारूचा टँकर उलटला ! पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे सातारा महामार्गावर आज सकाळी पहाटे ४ च्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक भरधाव वेगतील दारूचा टँकर रस्त्यावर पलटी झाला असून या मुळे मोठ्या प्रमाणात अल्कोहोल रस्त्यावर सांडले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत ट्रक चालक हा जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे काही कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी क्रेनच्या साह्याने हा कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू केले. हा कंटेनर बाजूला घेण्यात आला आहे.

पुण्यात आज सकाळी खेडशिवापुर येथे एक अपघात झाला. पहाटे ३.४४ च्या सुमारास खेड शिवापुर टोल नाक्याच्या पुढे तृप्ती हॉटेल समोर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा अल्कोहोल घेऊन जाणारा टँकर (MH ४८ BM ४१३२) हा सांगली वरून वसई विरारला जात असतांना पलटी झाला. अपघातांमुळे टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावर सांडले होते.

या अपघाताची माहिती मिळताच, पीएमआरडीए, नांदेड सिटी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी आल्यावर टँकरमध्ये वाहन चालक व सोबत असलेल्या व्यक्ती अडकून पडला असल्याचे दिसले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेत चालक टँकरहा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा या मार्गावर लागल्या होत्या. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने अपघात ग्रस्तटँकर रस्त्याच्या बाजूला करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या कामात अग्निशामक जवान सुजित पाटील, वाहन चालक राठोड, फायरमन- शुभम माळी, पंकज माळी, साळुंखे, मायनाले यांनी सहभाग घेत हा टँकर बाजूला करून येथील वाहतूक सुरळीत केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments