Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजखेड तालुक्यात अंगावर वीज पडून आदिवासी कुटूंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

खेड तालुक्यात अंगावर वीज पडून आदिवासी कुटूंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

खेड : आळंदीलगत चहोली खुर्द (ता. खेड) हद्दीतील वडगाव आळंदी रस्त्यावरील ठाकरवाडी येथे अंगावर वीज पडून आदिवासी कुटूंबातील एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओंकार मारुती ठाकर (वय-१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. मात्र, पावसाच्या तुलनेत विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात होता. दरम्यान कामावरून दुचाकीने घरी येत असताना ओंकारच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ओंकारचा जागीच मृत्यू झाला. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह आळंदी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील दुसरी घटना

खेड तालुक्यात वीज पडून जीवितहानी होण्याची दोन दिवसात ही दुसरी घटना आहे. आज घडलेल्या घटनेतील ओंकारच्या घरची परिस्थिती हलाखीची असून कष्ट करून उदरनिर्वाह केला जात आहे. त्यामुळे शासनाने ओंकारच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments