Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज खून करून हडपसरमध्ये माजवली दहशत; आदनान शेखसह टोळीतील ९ जणांवर मोक्का

खून करून हडपसरमध्ये माजवली दहशत; आदनान शेखसह टोळीतील ९ जणांवर मोक्का

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : हडपसर परिसरात टोळी तयार करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गुन्हे करणाऱ्या आदनान आबीद शेख या टोळीप्रमुखासह टोळीतील ९ सदस्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आदनान शेख आणि त्याच्या साथीदारांनी १७ ऑगस्ट रोजी गुलाम अलीनगर परिसरात एकाचा खून करून परिसरात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांपैकी टोळीप्रमुख आदनान आबीद शेख (२५, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), सादिक अब्दुल करीम शेख (५६, रा. गुलाम अलीनगर, हडपसर), अनिस सादिक शेख (३२), शाकीर कादर सैय्यद (३०), मोहसीन जावेद शेख (२४) आणि शहाबाज कादीर शेख (२८) यांना अटक करण्यात आली आहे, तर जाकीर कादर सैयद (४५), अमीर अकिल सैयद (२०), सिकंदर आयुब शेख (३५) आणि अकबर अफजल हुसेन शेख (४३, सर्व रा. हडपसर) हे अद्याप फरार आहेत.

टोळीचा म्होरक्या आदनान याने संघटित टोळी तयार करून परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी तसेच इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या हेतूने गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी टोळीवर मोक्का कारवाई करण्यात यावी म्हणून पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त। रितेश कुमार यांनी आदनान शेख टोळीच्या १० जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments