Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजखामगावात एका रात्रीत ५ ठिकाणी घरफोडी; तब्बल २ लाखांचा मुद्देमाल लंपास

खामगावात एका रात्रीत ५ ठिकाणी घरफोडी; तब्बल २ लाखांचा मुद्देमाल लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कासुर्डी, नाथाचीवाडी, देवकरवाडी, डाळिंब, पाटस परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता खामगाव येथे एका रात्रीत ५ ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे. गाडामोडी येथील एका दुचाकीसह खामगाव येथील चार वेगवेगळ्या घरातून दागिने, रोख रक्कम असा तब्ब्ल २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत सचिन सुरेश नागवडे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव परिसरातील गणेश नगर येथील सचिन सुरेश नागवडे यांच्या बंद असलेल्या दोन खोल्यांचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील २५ हजार रोख रक्कम, अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या चोरी केल्या. तसेच शेजारी राहणारे रामचंद्र जयसिंग नागवडे यांच्या घरातील लोखंडी पेटीत असलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळा वजनाच्या दोन अंगठ्या, कानातील बाळ्या यासह ३५ हजार रोख रक्कम चोरी केले.

प्रदीप बबन नागवडे यांच्या घरात अडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून ३ हजार रुपये आणि संतोष बाबुराव नागवडे यांची तीनशे रुपये चोरी झाल्याची घटना घडली आहे. घराच्या जवळच असलेल्या शेतात जयसिंग नागवडे यांच्या घरातील लोखंडी पेटी टाकून चोरटयांनी पाल काढला. तर खामगाव परिसरातील गाडामोडी येथील संकेत बाळासाहेब पंडित यांची एम एच १४ बी एस ९३६० दुचाकी देखील चोरटयांनी पळवली आहे.

दरम्यान, १ लाख ८० हजार सोन्याच्या दागिन्यासह ६३ हजार ३०० रुपये रोख रक्कम आणि ३० हजार किमतीची दुचाकी असा एकूण २ लाख ७३ हजार ३०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

खामगाव परिसरात एकाच वेळी अनेक ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत यवत पोलिसांनी वाढत्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments