Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजखाजगी बसने दिलेल्या धडकेत सोरतापवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू

खाजगी बसने दिलेल्या धडकेत सोरतापवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावर खाजगी बसने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर पेट्रोल पंपासमोर सोमवारी (ता. ०३) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

प्रविण हरिश्चंद्र मगर (वय 51, रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मुळ रा. वाघोली, ता. जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेली व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी प्रज्ञा प्रविण मगर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रज्ञा व त्यांचे पती प्रवीण हे दोघेजण सोरतापवाडीच्या दिशेने निघाले होते. देवकर पेट्रोल पंपासमोर आले असता खाजगी बस नं. एम. एच 14 के. ए. 9252 या अज्ञात वाहनचालकाने रस्त्याचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात बस चालवून प्रवीण यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रवीण मगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी प्रज्ञा मगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments