Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजखाजगी चारचाकीस पोलिसांच्या गाडी प्रमाणे रंगरंगोटी

खाजगी चारचाकीस पोलिसांच्या गाडी प्रमाणे रंगरंगोटी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वडगाव शेरी – एका खाजगी चारचाकी वाहनाला हुबेहूब पोलीस वाहनाप्रमाणे रंगरंगोटी करून ते पोलिसांचे शासकीय वाहन असल्याचे भासवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. खराडी येथील चंदननगर पोलीस ठाण्याकडून हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी मात्र या आरोपाचे खंडन केले असून पोलिसांच्या मदतीसाठी परिसरातील आयटी कंपन्यांनी हे वाहन पुरवल्याचे माहिती दिली आहे.

या भागातील माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल निकाळजे यांनी चंदननगर पोलीस ठाण्याच्या आखतारीत असलेल्या वाहनांची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून मागवली होती. त्यानुसार चंदन नगर पोलीस ठाण्याच्या आखतारीत असलेल्या आणि वापरात असलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती देण्यात आली.

मात्र चंदन नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वापरात असलेले खाजगी चार चाकी वाहन (क्रमांक MH12 NU 8642) याची माहिती मात्र देण्यात आली नाही. त्यावरून अधिक माहिती घेतल्यावर हे वाहण खाजगी असल्याचे निष्पन्न झाले.

याविषयी अमोल निकाळजे म्हणाले, या खाजगी चारचाकी वाहनाला हुबेहूब पोलिसांच्या शासकीय वाहनाप्रमाणे बेकायदा रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील पोलीस अधिकारी हे वाहन आरोपींची ने आण करण्यासाठी, तपासासाठी वापरतात.

तसेच रात्रीच्या वेळी खराडी बायपास चौकात हे वाहन उभे असते. काही कर्मचारी या वाहनाच्या सोबत उभे राहून पोलिसांची मोठी कारवाई सुरू असल्याचे भासवतात. पोलिसांचे वाहन पाहून नागरिकही घाबरतात. चंदननगर पोलिसांकडे चार मोठी चार चाकी वाहने आणि सात दुचाकी वाहणे वापरासाठी उपलब्ध आहेत. असे असूनही खाजगी वाहनाचा शासकीय कामासाठी वापर का, याची चौकशी व्हायला हवी.

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निकाळजे यांनी केली असून तसे पत्र त्यांनी पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले आहे.

उपस्थित झालेले प्रश्न …

• पोलीस ठाण्याकडे पुरेशी वाहन संख्या उपलब्ध असूनही खाजगी वाहनांचा वापर का?

• या वाहनाच्या देखभालीचा आणि इंधन खर्च नेमके कोण करते?

• खाजगी वाहन बेकायदेशीर वापरताना अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण?

• पोलीस ठाणे समोर उभे असलेल्या या वाहनाची माहिती वरिष्ठांना का नाही ?

• पोलिसांच्या मदतीकरता आयटी कंपनीने पुरवलेल्या वाहनासाठी व रनागरांगोटीसाठी पोलीस आयुक्तालयाची परवानगी घेण्यात आली का?

• खाजगी वाहन वापरण्यासाठी परवानगी घेतली असेल तर माहिती अधिकारात ती माहिती का देण्यात आली नाही?

मनीषा पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे) –

परिसरातील आयटी कंपन्यांनी पोलिसांच्या मदती करता हे वाहन 2016 पासून पुरवलेले आहे. चंदननगर पोलिसांकडे पूर्वी असलेली चार चाकी वाहने जुनी झाली होती. त्यामुळे आयटी कंपनीकडून हे वाहन घेण्यात आले. याची कल्पना पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली आहे. वाहन पोलिसांसारखे दिसावे याकरता केलेली रंगरंगोटी ही काहीतरी विचार करूनच केलेली आहे. पोलिसांवर लावलेले आरोप चुकीचे आहेत. पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments