Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजखाजगीतील व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर केला व्हायरल, डिलीट करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखासह...

खाजगीतील व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर केला व्हायरल, डिलीट करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखासह केली पैशांची मागणी; वानवडी पोलीसांकडून आरोपी अटकेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्नानगृहातफ्रेश होण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून तो इंन्टाग्रामवर प्रसारीत केला. त्यानंतर व्हिडीओ इंन्टाग्रामवरून काढून टाकण्यासाठी पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत 30 हजार रुपये मागीतल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने तत्काळ वानवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी कृष्णा संपत शिंदे (वय. २० वर्षे, धंदा केटरिंग, रा. चव्हाण मळा झोपडपट्टी, बिटको पोलीस चौकीच्या पाठीमागे, नाशिक रोड, नाशिक) यास नाशिक येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या त्यांच्या राहत्या घरी पत्र्याचे शेड असलेलया स्नानगृहात अर्धनग्न अवस्थेत फ्रेश होण्यासाठी गेली असता त्या महिलेचा खाजगीतील व्हिडीओ आरोपी कृष्ण संपत शिंदे याने त्याचेकडील मोबाईलद्वारे शुट केला. तसेच तो व्हिडीओ आरोपीने इंन्टाग्राम या सोशल मिडीयावर व्हायरल सुद्धा केला. सदर व्हिडीओबाबत पिडीत महिलेस माहिती मिळाल्याने आरोपी संपत शिंदेला विचारणा केली, परंतु त्याने तो व्हिडीओ डिलीट करुन काढण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची किंवा ३० हजार रुपये रोख रक्कमेची मागणी केली. त्यामुळे पिडीत महिलेने वानवडी पोलीस ठाणे येथे धाव घेतली. पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची वेगाने सुत्र फिरून पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व अतुल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण करुन सोशल मिडीयाबाबत माहिती घेतली आणि वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे व गोपाळ मदने हे आरोपीचा माग काढत नाशिक येथे पोहचले.

नाशिक येथुन आरोपी कृष्णा संपत शिंदे यास नाशिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली. आरोपी कृष्णा शिंदेकडे तपासणी केली असता त्यास पैशाची गरज असल्यामुळे त्याने पिडीत महिलेचा खाजगीतील व्हिडीओ शुट करुन तो बनावट इन्स्टा आयडी तयार करुन व्हायरल केला आणि तो डिलीट करण्यासाठी पिडीतेकडून ३०, हजार रुपयांची मागणी केली व ते न दिल्यास शरीर सुखाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments