Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजखवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी 7 जण ताब्यातः 17 फेब्रुवारीपर्यंत 6 आरोपींना सुनावली...

खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी 7 जण ताब्यातः 17 फेब्रुवारीपर्यंत 6 आरोपींना सुनावली वनकोठडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजर (इंडियन पॅगोलीन) या शेड्युल १ मधील वन्यप्राण्याची तस्करी केल्या प्रकरणात ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी ६ आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहीदास पंढरीनाथ कुळेकर वय ५५ वर्ष, कांताराम सखाराम वाजे वय ४९ वर्ष दोघे रा. भोमाळे (ता. खेड), सखाराम बबन मराडे वय ४३ वर्ष, रा. पाभे (ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे वय ३१ वर्ष, रा. तळेराण (ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे वय ६५ वर्ष, रा. बडेश्वर (ता. मावळ), श्रीमती गीता नंदकुमार जगदाळे रा. चव्हाणवस्ती कुमठे (ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर वय ३२ वर्ष, रा. करंजाळे (ता. जुन्नर) असे एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ६ आरोपीना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली. वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर १९२६ या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक पाटील यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments