Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजखळबळजनक...! मित्रांनीच केला घात; बर्थडे बॉयची इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून हत्या

खळबळजनक…! मित्रांनीच केला घात; बर्थडे बॉयची इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून हत्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उल्हासनगर : मुंबईच्या उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या मजल्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना २७ जून रोजी घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे. कार्तिक वायाळ असं मृत तरुणाचं नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील चिंचपाडा परिसरात कार्तिक वायाळ हा राहण्यास होता. त्याचा २७ जून रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त कार्तिकने त्याचे मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती.

मात्र, या पार्टीत दारूवरून चौघांमध्ये वाद सुरू झाला. या वादात कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. याचा राग आल्याने निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिकला उचलून चौथ्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिले. या घटनेत कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.

आरोपींनी रचला बनाव

या सर्व प्रकारानंतर आरोपींनी बनाव रचला. कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला. त्यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो होतो. रुग्णालयातून परत आल्यानंतर कार्तिक हा मृतावस्थेत इमारतीच्या खाली आढळून आल्याचे आरोपींनी कार्तिकच्या वडिलांना सांगितले. मात्र, वडिलांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यांनी कार्तिकच्या खुनाची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments