इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात बायकोला अपशब्द वापरल्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नवऱ्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अशोक जाधव असे आरोपी पतीचे नाव आहे. बायकोला अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीची नवऱ्याने हत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील बादलीने मारहाण करीत तसेच चाकूने वार करीत नवऱ्याने एक जणाची हत्या केली. पत्नीविषयी अपशब्द बोलल्यामुळे आलेल्या रागातून पतीने हे भयंकर कृत्य केलं आहे.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्याला ताब्यात घेतले असून सिंहगड रोड पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.