Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजखळबळजनक...! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

खळबळजनक…! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

राजगुरूनगर : खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १८ डिसेंबर रोजी राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात घडली आहे. स्नेहा एकनाथ होले (वय १५ होलेवाडी ता, खेड) असे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, स्नेहा होले ही राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय इयत्ता नववीत शिकत होती. सकाळी ती रोजच्या प्रमाणे शाळेत आली होती. शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमाला बसली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यांतर तिला अचानक चक्कर आली.

शिक्षकांनी तात्काळ तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदयविकाराने स्नेहाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. स्नेहाच्या पाठीमागे एक भाऊ, आई वडील असा परिवार आहे. या घटनेने होलेवाडीत व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments