Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजखळबळजनक...! तरुणीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; हडपसर भागातील घटना

खळबळजनक…! तरुणीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; हडपसर भागातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना 13 मे रोजी मध्यरात्री एक ते 14 मे सकाळी नऊच्या दरम्यान हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली आहे. मोनिका कैलास खंडारे (वय-24 रा. कसुरा ता. बळापुर, जि. अकोला) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय-30 रा. कसुरा ता. बळापुर जि. अकोला) यानेही सिलिंग फॅनला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकाश खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका आणि आकाश गावावरून लग्न करण्याच्या उद्देशाने पळून पुण्यात आले होते. त्यांनी हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रोडवरील स्पॉटलाईट हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. आकाशने 13 मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने बेडशीटच्या सहाय्याने खोलीतील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दोघेजण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हडपसर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोघांच्या कुटुंबियांची चौकशी केली. चौकशीमध्ये मोनिका आणि आकाश यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे दोघेजण पुण्यात पळून आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गिते करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments