Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजखळबळजनक..! चारित्र्यावर संशय घेत पतीनेच केला पत्नीचा खून; नन्हे भागातील घटना

खळबळजनक..! चारित्र्यावर संशय घेत पतीनेच केला पत्नीचा खून; नन्हे भागातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरातील नन्हे भागात खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नन्हे भागात घडली आहे. त्यानंतर याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नन्हे, रा. वडूज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पती कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रेश्मा हिचा पहिला विवाह झाला होता. तीने आरोपी कुमारशी दुसरा विवाह केला होता. पहिल्या पतीपासून त्यांना दोन अपत्य होते. महिनाभरापूर्वी त्या कुमार याच्यासोबत नन्हे भागात राहायला आल्या होत्या. कुमार रेश्मा यांच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते.

अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी आला होता. त्याने पत्नी रेश्माशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद एवढा विकोपाला गेला की पती कुमारने पत्नी रेश्माचा ओढणीने गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी आरोपी पती कुमारला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments