Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजखळबळजनक...! आईच्या फोनमध्ये बॉयफ्रेंडसोबतचे फोटो अन् व्हिडीओ; संतापलेल्या अल्पवयीन मुलाने चिरला आईचा...

खळबळजनक…! आईच्या फोनमध्ये बॉयफ्रेंडसोबतचे फोटो अन् व्हिडीओ; संतापलेल्या अल्पवयीन मुलाने चिरला आईचा गळा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. आईच्या फोनमध्ये या मुलाने आईचे आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले. त्यामुळे त्याने रागाच्या भरात हे भयंकर कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला सुधारगृहात पाठवले आहे. ही घटना चुनाभट्टी परिसरात रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी परिसरात 9 वीत शिकणारा मुलगा घरात आईच्या मोबाईलमध्ये गेम खेळत होता. रात्री साडे अकराच्या सुमारास गेम खेळताना या मुलाला आईच्या मोबाईलमध्ये तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि काही व्हिडीओ आढळून आले. त्यामुळे मुलाला संताप अनावर झाल्याने त्याने चाकू घेतला आणि आईच्या गळ्यावर सपासप वार केले. महिलेचा आरडाओरड ऐकून शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हल्ल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलाला सध्या सुधारगृहात पाठवले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments