Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार

खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक आता वळविणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कान्हा हॉटेल चौकामधील ग्रेड सेप्रेटरचे काम करण्यासाठी खडी मशीन चौकामधून कात्रजकडे जाणारी वाहतूक शनिवार (दि. २०) पासून पर्यायी रस्त्याने एसबीआयपर्यंत वळवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली.

महापालिका प्रशासनाकडून कान्हा हॉटले चौकात ग्रेड सेप्रेटरचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी येथील वाहतूक बंद करावी लागणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पथ विभागाने अधिकारी यांनी येथील कामाची पाहणी केली. खडी मशीन चौकापासून पर्यायी रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे आणि गतिरोधक बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक वळवण्यात येईल, असेही ढाकणे यांनी सांगितले.

रस्ता ५० मीटरचाच करणार

कोंढवा येथील खडी मशीन चौक ते मंतरवाडीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, देवाची उरूळी आणि मंतरवाडीपर्यंतचा रस्ता ५० मीटर रुंद गृहीत धरूनच रस्त्याच्या दुतर्फा बांधकामांना परवानगी द्यावी, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाला देण्यात येईल. सद्यःस्थितीत हा रस्ता २० मीटर रुंद असून उंड्री येथील सुमारे २७० मीटर रस्ता हा ८ मीटरच रुंद आहे. या ठिकाणी भूसंपादन करून हा रस्ता २० मीटर रुंदीचा करून घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments