इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून खडकी बाजार परिसरात शनिवारी (दि. २९) भरदुपारी एका तरुणावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत विशाल दीपक काळे (वय २०, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) हा तरुण जखमी झाला. यासंदर्भात गणेश दादू पातरकर (वय १७, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
दीपक व गणेश खडकीमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. तिथे एका टोळक्याने त्यांना अडवले व त्यांच्या पट्ट्याबाबत चौकशी केली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून या टोळक्याने धारदार शस्त्राने या दोघांवर हल्ला चढवला. त्यांच्या तावडीतून विशालने पळ काढला. त्यानंतर, या टोळक्याने पाठलाग करून त्याला होळकर पुलाजवळ बेदम मारहाण केली.