Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजक्लास वरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून काढले फोटो; जबरदस्तीने थेऊर...

क्लास वरून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून काढले फोटो; जबरदस्तीने थेऊर येथील नर्सरीत नेत केला विनयभंग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे): लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्लासमधून घरी जाणाऱ्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने थेऊर येथील नर्सरीत घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला नातेवाईकाच्या घरी नेऊन मारहाण केली. हा प्रकार लोणी काळभोर आणि अहमदनगर येथे एप्रिल 2023 ते 24 जून 2024 या कालावधीमध्ये घडला.

याप्रकरणी 16 वर्षाच्या पिडित मुलीने मंगळवारी 25 जून रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय नामदेव नेटके (वय-26 रा. हिसरे, ता. करमाळा जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी क्लास मधून घरी जात होती, त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडित मुलीची दुचाकी रस्त्यात अडवून तिला जबरदस्तीने थेऊर येथील एका नर्सरीमध्ये घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपी पीडित मुलीला अहमदनगर येथील नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी एका खोलीत तिला डांबून ठेवून बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीने मुलीला चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments