Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजक्रूरतेचा कळस...! दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे कपडे फाडले; भावावर केले वार

क्रूरतेचा कळस…! दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे कपडे फाडले; भावावर केले वार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर आईच्या मदतीला आलेल्या भावावरही कात्रीने वार केले. हही घटना वाकड येथील जगताप डेअरी चौक परिसरात सोमवारी १० जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याबाबत ५५ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ११) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ३५ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना त्यांचा ३५ वर्षीय लहान मुलगा घरी आला. त्याने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या मुलाने आईच्या अंगावरील कपडे फाडत तिला फरफटत घराबाहेर नेत शिवीगाळ केली. त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढंच नाही तर, आईच्या मदतीला आलेल्या मोठ्या भावावर ३५ वर्षीय मुलाने कात्रीने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments