इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा परत एकदा समोर आला आहे. जळगाव मध्ये क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेड काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी छेडछाडीचे प्रकरण असल्यास पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घेत अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असे म्हटले आहे.
पोलिसांनी मवाळ भूमिका घेऊ नयेः मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत, श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव वर्ष ७५० या निमित्ताने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी जहाल भूमिका घेऊन अशी समाज घातक प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे.