Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज क्राऊन प्रिन्स-मोदींमधील चर्चेनंतर बारसू रिफायनरीबद्दल शिवसेना खासदाराच महत्त्वाच वक्तव्य

क्राऊन प्रिन्स-मोदींमधील चर्चेनंतर बारसू रिफायनरीबद्दल शिवसेना खासदाराच महत्त्वाच वक्तव्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : G20 परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स भारतातच थांबले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. यात बारसू रिफायनरीचा मुद्दा होता. 100 बिझनेसमन आणि 7 मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह सौदीचे क्राऊन प्रिन्स भारतात आले होते. बारसू रिफायनरीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्या बद्दल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला. “महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून महत्वाची गोष्ट आहे… सामंजस्य करारामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रिफायनरी प्रकल्प मार्गी लागेल. बारसू महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राचा जीडीपी यामुळे वाढू शकतो. कोकणातल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. हा ग्रीन प्रोजेक्ट आहे. पर्यावरणाच्या दुष्टीने सर्व उपायोजना यामध्ये असतील. सामंजस्य करारामुळे हा प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा बाळगतो” असं राहुल शेवाळे म्हणाले.

“बारसूला असणाऱ्या विरोधासंबंधी राज्य सरकार आणि मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बारसू प्रकल्पाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात येतील. पर्यावरण दृष्टीकोनातून अवलंब करण्यात येईल. बारसू आणि रत्नागिरीतील नागरिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल’ असं राहुल शेवाळे म्हणाले. ऊर्जा खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पण या विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यावरुन उलट-सुलट राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यासंबंधी राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला. “विरोधकांकडून वातावरण निर्मिती केली जात आहे. बैठक घेतली हा शासकीय कामकाजाचा विषय आहे. त्यात विनाकारण राजकारण आणू नये असं उत्तर राहुल शेवाळे यांनी दिलं.

‘त्यामुळे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत’

महायुतीमधील तिन्ही पक्ष सामंजस्याने काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम सुरु आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कामाच्या धडाक्याने विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण झालीय त्यामुळे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत” असं राहुल शेवाळे म्हणाले.

RELATED ARTICLES

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

Recent Comments