Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज क्राईम ब्रँच फंडा अन् अभियंत्याला 20 लाखांचा गंडा: फेडेक्समधून बोलत असल्याचे...

क्राईम ब्रँच फंडा अन् अभियंत्याला 20 लाखांचा गंडा: फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगत फसवणूक, अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फेडेक्समधून बोलत असून तुमच्या आधार कार्डचा नंबर वापरून मुंबई ते तैवान असे पार्सल पाठवले जात आहे. त्यात 5 मुदतबाह्य पासपोर्ट, 5 डेबिट कार्ड, 750 ग्रॅम एमडीएमए ड्रग्स अशा गोष्टी पाठवण्यात येत असून पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेटसाठी नार्कोटिक्स सेल मुंबईला अंधेरी येथील वर्ग करीत आहे, असे सांगून बँक खात्याची माहिती घेऊन एका अभियंत्याची तब्बल 20 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी कुमठेकर रस्ता येथे राहणाऱ्या 37 वर्षीय अभियंत्याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलवर फोन करून फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार नंबर वापरून मुंबई येथून एक पार्सल तैवानला पाठवले असून, त्यामध्ये त्यात 5 मुदतबाह्य पासपोर्ट, 5 डेबिट कार्ड, 750 ग्रॅम एमडीएमए ड्रग्स अशा गोष्टी पाठविण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेट घ्यावे लागेल, यासाठी तुमचा फोन अंधेरी येथील नार्कोटिक्स सेलला ट्रांसफर करत आहे.

यानंतर समोरील व्यक्तीने फिर्यादी यांना सांगितले की, तुम्हाला 3 ते 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच सायबर चोरटयांनी फिर्यादी यांना स्काईप वर व्हिडीओ कॉल करायला सांगितला. यानंतर मुंबई नार्कोटिक्सला जोडायला सांगून आधार कार्ड स्क्रीनवर ठेवून बोलण्यास सांगितले. तसेच तुमचे बँक खाते मनीलाँड्रिंगसाठी वापरण्यात येत असून आम्हाला ट्रान्सजेक्शन करून बघायचे आहे, असे सांगितले. यानंतर सायबर चोरटयांनी फिर्यादी यांच्या कागपत्राचा आधारे 20 लाखांचे कर्ज घेऊन ते आपल्या बँक खात्यावर वळवून फिर्यादी यांची 20 लाखांची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments