Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजक्राईम (इतर): बनावट फोटोच्या आधारे तरुणीकडून खंडणी उकळणारा आरोपी गजाआड, 34 तोळे...

क्राईम (इतर): बनावट फोटोच्या आधारे तरुणीकडून खंडणी उकळणारा आरोपी गजाआड, 34 तोळे सोने हस्तगत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीला फेसबुकवर सुरज जैन नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिला तो एका मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचे भासवून तिच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण करुन तिला बाहेर भेटण्यास बोलवले.

त्यानंतर एकत्र फोटो काढून सदरचे फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करुन सोशल मिडियावर संबंधित फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन तरुणीकडून ३४ तोळे सोन्याचे दागिने अारोपीने घेतले होते. याबाबत निगडी पोलीसांनी या गुन्हयातील अारोपीचा शोध घेऊन त्यास अटक करत, ३४ तोळे सोने जप्त केल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली अाहे.

सुरज लक्ष्मण परमार ऊर्फ सुरज जैन ऊर्फ सुरेश भिवशी कदम ऊर्फ द्रिश मालपाणी (वय- २८, रा. सय्यदनगर, पुणे) असे अटक करण्यात अालेल्या अारोपीचे नाव अाहे. याबाबत अारोपीवर निगडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिची व अारोपीची सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठया घरातील मुलगाअसल्याचे भासवून अोळख निर्माण झाली होती. तरुणाला भेटल्यावर त्याने अाक्षेपार्ह फोटो मॉर्फ करुन ब्लॅकमेलिंग सुरु केले. तिच्याकडून ३४ तोळे सोने घेतल्यावर देखील अारोपी तिच्याकडे सतत अाणखी सोन्याचे दागिने पुन्हा देण्याची मागणी करत होता.

तरुणीने पुन्हा सोने देण्यास नकार दिल्याने अारोपीने तीचे फेसबुक आयडी स्वतःचे मोबाईल मध्ये सुरु करुन त्यावरुन सदरचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केल्याने याबाबत निगडी पोलिस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्वीनी कदम यांनी सदर गुन्हयाचा तपास सुरु केला. तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी तांत्रिक विशलेषण करुन आरोपीची खरी अोळख पटवून सलग तीन दिवस सय्यदनगर, हडपसर, पुणे परिसरात सापळा रचून अारोपी सुरज लक्ष्मण परमार ऊर्फ सुरज जैन यास अटक केली. त्याच्याकडील सखोल तपासात त्याने त्याचे मैत्रिणीच्या नावाने विक्री केलेले पिडित तरुणीचे ३४ तोळष सोन्याचे दागिने व अारोपीने मॉर्फ केलेले फोटो हस्तगत करण्यात अाले अाहे. अारोपीकडे केलेल्या तपासात त्याचे अशाचप्रकारे अनेक महिलांना फसवणुक केल्याचे निर्देशनास अाले अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments