Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजकौतुकास्पद...! उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

कौतुकास्पद…! उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील 12 विद्यार्थी झळकले आहेत. इयत्ता 5 वीतील शिष्यवृत्ती परीक्षेत 06 आणि इयत्ता 8 वीतील शिष्यवृत्ती परीक्षेत 06 असे एकूण 12 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवत विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीसाठीची परीक्षा फेब्रुवारीत पार पडली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवीचे 34 विद्यार्थी व आठवीचे 28 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी इयत्ता पाचवीचे 27 व आठवीचे 11 विद्यार्थी पात्र झाले आहेत.

पाचवीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे

अवंती दीपक वाळके, आर्यन शंकर कांचन, आरान अलीम शेख, आर्या मंगेश कुलकर्णी, आरोही महादेव पिलाने, आर्यन गजानन क्षीरसागर

आठवीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे श्रावणी सचिन भोसले, ऋतुजा श्रीधर मोहूलें, आर्या मनोज मोडक, ऋतुजा राहुल कोकळगी, चेतन सचिन शेलार, पृथ्वीराज बालाजी भिलारे हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना अध्यापकांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना शेखर शिंदे, वैशाली ढोबळे, रुपाली खानदेशे, शितल वाळके, वंदना कोकाटे, ज्योत्स्ना काळे या प्राध्यापकांनी तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना अविनाश भोसले, विक्रांत पंडित, सचिन पंडित, विशाल भांडवलकर, स्नेहल जगताप, माया चव्हाण, भागवत कराड या अध्यापकांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

दरम्यान, या सर्व यशस्वी गुणवंतांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी विश्वस्त, विद्यालयाचे प्राचार्य, उपप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments