Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजकौटुंबिक वादातून सहा वर्षाच्या मुलाचे अपहरणः करणाऱ्या दोन महिलांना बेड्या; फरासखाना पोलिसांची...

कौटुंबिक वादातून सहा वर्षाच्या मुलाचे अपहरणः करणाऱ्या दोन महिलांना बेड्या; फरासखाना पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कौटुंबिक वादातून सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलांना फरासखाना पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकत मुलाची सुटका केली. नाझमा बिलाल शेख (43, रा. बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, बुधवार पेठ), रेणु दिलीप राठोड (41, रा. बुधवार पेठ, ढमढेरे बोळ) असे अटक करण्यात आलेल्या महिलांचे नाव आहे. 4 एप्रिल रोजी सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यातील अपहरण झालेला सहा वर्षाच्या मुलाचा शोध घेत असताना पोलिस अमंलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर रिक्षा चालकांकडून माहिती घेतली. रिक्षात मुलाला घेवुन जाणाऱ्या अनोळखी महिलांची ओळखी पटली. दरम्यान त्या दोनही महिला बुधवार पेठेत राहण्यास असल्याचे समजले. तसेच त्यांनी मुलाला स्वारगेट येथे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्या पैकी सुरवातीला एकीला ताब्यात घेतल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मुलगा हा रेणु राठोड हिच्याकडे असल्याचे तिने सांगतले.

6 एप्रिल रोजी महिला मुलाला घेवुन स्वारगेट एसटीस्टँड परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याचे समजले. त्यानुसार रेणु राठोडला ताब्यात घेत अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक जयसिंग दाढे, निलेश मोकाशी, अमंलदार मेहबुब मोकाशी, गोविंद गुरव, आशा कांबळे, जयश्री पवार, पुनम ओव्हाळ, मिनाझ शेख यांच्या पथकाने केली.

दोन महिलांना अटक

एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण दोन महिलांनी घरगुती कारणातून केले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे आमचे पथक अपहरण करणाऱ्या दोन महिलांपर्यंत पोहचले त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फरासखाना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments