इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने देश पातळीवर सदस्यनोंदणी कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचबरोबर देशभरात अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी येत्या काही दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांची यादी माझ्या खिशात व मनात आहे, त्यामुळे ती नावे आज सांगणार नाही. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
महाडिक म्हणाले, देशापाठोपाठ महाराष्ट्र, तसेच नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपला भरघोस यश मिळाले. त्यामुळे भाजपकडे नेत्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोल्हापुरातील काही महत्त्वाचे नेते, तसेच पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.